संपादक-२०२२ - लेख सूची

मनोगत

ऑक्टोबरच्या अंकाचा विषय – नीतिनियम, न्याय-अन्याय – आम्हाला महत्त्वाचा वाटला होता. सोबतच वाचकांना आणि लिहिणाऱ्यांनादेखील तो तितकाच महत्त्वाचा वाटावा याचा अनुभव या अंकाच्या प्रकाशनानंतर आला. नीतिनियम, न्याय, अन्याय यांसारख्या विषयावर मूळ लेख भरपूर आले आणि प्रकाशित झालेल्या लेखांवर अभिप्रायही भरपूर आले. लोकांना या विषयावर बोलते व्हावेसे वाटले यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. ह्या अंकासाठी लेख …

मनोगत – आपले नंदाकाका

अनंत यशवंत उर्फ नंदा खरे उर्फ नंदाकाका ह्यांचे, दि. 22 जुलै 2022 ला, दीर्घ आजारानंतर, पुण्यात निधन झाले. मुळात स्थापत्यअभियंता असलेले नंदाकाका, सुरुवातीला ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात, आणि नंतर अनेक वर्षे ‘सुधारक’चे संपादक होते.  ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर होता. इतिहासापासून जीवशास्त्रापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून भूगर्भशास्त्रापर्यंत सर्वच विषयांत त्यांना रस आणि गती होती. त्यांनी जशी विविध विषयांवर …

आवाहन

स्नेह अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाचा गर्भपातावर बंदी घालण्याचा निर्णय असो की बिल्किस बानो प्रकरणातून गुन्हेगारांना शिक्षेत मिळालेली माफी आणि बाहेर आल्यावर त्यांचे झालेले स्वागत असो, सामाजिक व्यवहारांमध्ये न्याय, अन्याय, नीति यांची संगती समजून घेणे गरजेचे झाले आहे. नीतिनियम आपल्याला वाईटापासून परावृत्त करतात. तर न्याय किंवा कायदे वाईटासाठी शिक्षा देतात. पण शिक्षा भोगल्यावर माणूस खरोखर अन्तर्मुख होतो …

मनोगत

इतिहासाकडे व्यक्तिनिष्ठ दृष्टीतून न बघता वस्तुनिष्ठ/सत्यनिष्ठ दृष्टीतून बघता यायला हवे. तसेच मुळात इतिहासाविषयीचा स्वीकार आला तरच बदलत्या सामाजिक मापदंडानुसार जे वाईट ते टाळण्याकडे आपोआपच आपला कल जाईल. यादृष्टीने ‘आजचा सुधारक’च्या जुलै अंकासाठी काही साहित्य यावे असे आवाहन आम्ही केले होते. या अंकातील लेखांमधून याविषयीचे विविध विचार वाचकांसमोर आम्हाला मांडता आले आहेत. या लेखांवर आणिक चर्चा …

आवाहन

स्नेह. इतिहास ही घडलेल्या घटनांची नोंद असते. त्या त्या काळातील सत्य परिस्थिती काय होती हे जाणून घ्यायचे असेल तर इतिहासाकडे व्यक्तिनिष्ठ दृष्टीतून न बघता वस्तुनिष्ठ/सत्यनिष्ठ दृष्टीतून बघता यायला हवे. तसे झाले नाही तर इतिहासाकडे बघताना जे झाले ते योग्य/अयोग्य, चांगले/वाईट, नैतिक/अनैतिक हे व्यक्तिनिष्ठ, भावनेनुसार ठरवले जाते. काळानुरूप हे मापदंडही बदलतात. जुने संदर्भ मिटवण्याचा, झाकण्याचा, तसेच …

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या एप्रिल अंकात शिक्षणक्षेत्रात अपेक्षित आमूलाग्र बदलांविषयी आणि त्या प्रयत्नात येत असणाऱ्या अडचणींविषयी लिहिताना अनेकांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाधारित विचार प्रगट केले. ह्या अनुभवांचे मूल्य कसे ठरवावे? कामे करत असताना होत असणारी निरीक्षणे, त्यात येणाऱ्या अडचणी आणि निघालेले/काढलेले मार्ग, एवढेच नव्हे तर, जे साधायचे आहे ते साधता येत नसल्याची तगमग समजून घेतली तर ह्या संस्थात्मक …

आवाहन

स्नेह. कोरोनाच्या नव्या लाटेत शाळा-कॉलेजेस बंद होऊ नयेत यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न झाले आणि त्यांना अपेक्षित यशही मिळाले.खरेतर, असे प्रयत्न करणाऱ्यांचेदेखील सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी फार अनुकूल मत असेलच असे नाही. पण पर्यायी व्यवस्थेच्या अभावी’आहे ते किमान सुरू तरी असावे’ एवढा विचार त्यामागे नक्कीच असणार. शिक्षणव्यवस्थेतील बदलांविषयी बोलताना अध्यापनशास्त्र, अभ्यासक्रम, मूल्यांकन यांवरच बोलले जाते. यासाठीच शाळेसारख्या रचना तयार झाल्या. शिक्षणविभाग आला. अभ्यासक्रम समिती तयार झाली. अभ्यासक्रमानुसार पुस्तकं …

मनोगत

‘आजचा सुधारक’चा लेखकवर्ग आणि वाचकवर्ग यांचे प्रतिसाद सुधारकच्या टीमसाठी एकंदरीतच अतिशय उत्साहपूर्ण ठरत आहेत. ऑनलाईन स्वरूपात सुरू केला तेव्हा सुधारकचा आवाका विस्तारावा अशी इच्छा असली तर ते इतक्या अल्प वेळात साध्य होईल अशी कल्पना नव्हती. आज सुधारकच्या लेखांवर येणारे प्रतिसाद नवनव्या विषयांवर साधकबाधक चर्चा होत आहे याचेच द्योतक आहेत. वैचारिक चर्चेमध्ये सर्वांत आवश्यक घटक असतो, तो प्रश्न …

आवाहन

स्नेह. नवीन कृषी कायदे मागे घेताना “आम्ही खुल्या अंतःकरणाने शेतकऱ्यांना समजावत राहिलो. पण आमच्याच प्रयत्नात काही कसर राहिली. देशवासियांची आम्ही माफी मागतो.” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. आजवर याच कायद्यांचे गुणगान गाणारे आणि दहशतवादी, माओवादी, सोंग घेतलेले गुंड, एवढेच नव्हे, तर अराजकतावाद्यांचे गिनिपिग्ज अशा वेगवेगळ्या शब्दांत आंदोलनकर्त्यांचा उपमर्द करणारे भारतीय जनता पक्षाचे सदस्य पंतप्रधानांच्या या कथनानंतर वेगळ्याच भूमिकेत शिरले. उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी …